Tag: BJP Maharashtra

पिंपरी-चिंचवडमध्ये शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप

पिंपरी : आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला शत-प्रतिशत समर्थन मिळवून देण्यासाठी पक्षाचे शहरातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शंकर जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रमविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, आमदार उमा खापरे व राज्यातील पक्षाच्या इतर नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याबरोबरच शहरात पक्...
अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील
महाराष्ट्र, मोठी बातमी

अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर : गुजरात (Gujarat) निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र (Maharashtra) कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress party) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारला केला आहे. वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात (Nagpur) येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्ली...
सोसायटीधारकांचे राष्ट्रवादीमार्फत प्रश्न सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ – विनायक रणसुभे
राजकारण, पिंपरी चिंचवड

सोसायटीधारकांचे राष्ट्रवादीमार्फत प्रश्न सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ – विनायक रणसुभे

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. ४ ऑक्टोबर २०२२ : शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटावेत, या प्रामाणिक हेतूने शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने "संवाद सोसायटीधारकांशी" हा अभिनव असा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटूच नयेत, त्याचे केवळ राजकारण करावे, आणि त्या प्रश्‍नांवर सत्ता मिळवावी, या अपेक्षेने झपाटलेल्या एकनाथ पवारांना पोटशूळ का झाला? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर प्रवक्ते विनायक रणसुभे यांनी भाजपच्या एकनाथ पवार यांना केला आहे. शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार सोसायटीधारकांशी उद्या (बुधवार) रोजी थेरगाव येथे संवाद साधणार आहेत. "संवाद सोसायटीधारकांशी" या कार्यक्रमावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी टीका केली होती. ...
आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा | आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान
महाराष्ट्र

आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा | आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान

मुंबई : घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते स्वतःच उघडे करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहात आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. मतदारांचा कौल खुंटीवर टांगून फसवणुकीने मिळविलेली सत्ता आणि प्रकल्पाच्या वाटाघाटींचा वाटा या दोन्ही बाबी हातून गेल्याने ठाकरे पितापुत्रांना नैराश्याने ग्रासले आहे. तळेगावजवळ जेथे हा प्रकल्प येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे, त्याबाबत साधा सामंजस्य करारदेखील ठाकरे सरकारने केलाच नसल्याचे स्पष्ट झाल...
पिंपळे सौदागर येथे भाजपाच्या निवडणुकीतील यशाचा जोरदार आनंदोत्सव
राजकारण

पिंपळे सौदागर येथे भाजपाच्या निवडणुकीतील यशाचा जोरदार आनंदोत्सव

कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकमेकांना भरले पेढे; शहर पुन्हा होणार भाजपमय; कार्यकर्त्यांना विश्वास पिंपरी, ता. १३ : चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने नुकतेच लागले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. चार राज्यात पुन्हा भाजपचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्याचा आनंदोत्सव प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून त्यांना वंदन करून घोषणा देत आमदार लक्ष्मण जगताप यांचा मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. १२) रोजी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशन शेजारील भाजपच्या कुंदा संजय भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर साजरा करण्यात आला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर एकत्र येवून एकमेकांना पेढे वाटून अभिनंदनही केले. यावेळी भाजपच्या चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा कुंदा भिसे आणि मोठ्या संख्...
आप्पा तांबे यांचा प्रभाग ३३ मध्ये बैठकांचा धडाका
राजकारण

आप्पा तांबे यांचा प्रभाग ३३ मध्ये बैठकांचा धडाका

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूकीची तारीख कधीही जाहिर होऊ शकते. त्याच अनुषंगाने भाजपचे युवा नेते देविदास आप्पा तांबे यांचा बैठकांचा धडाका सुरू आहे. आप्पा तांबे प्रभाग क्रमांक ३३ मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक आहेत. रहाटणीतील प्रभाग क्रमांक ३३ हा बैठी घरे तसेच उच्चभ्रू सोसायटी अशा संमिश्र परिसरात पसरला आहे. या परिसरातील नागरिकांशी आप्पा तांबे यांनी थेट संपर्क सुरू केला असून विविध हाऊसिंग सोसायटी, कॉलनी व महिला बचत गटांच्या बैठकांवर तांबे यांनी जोर लावला आहे. या बैठकीत नागरिक तांबे यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करत आहेत. यावेळी तांबे यांच्या वतीने महिला व तरूणांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात येत आहे. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या...