लोकोपयोगी उपक्रमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागरिकांशी जोडणार नाळ

लोकोपयोगी उपक्रमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागरिकांशी जोडणार नाळ
  • विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचा निर्धार
  • युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या पुढाकाराने 46 प्रभागात कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील 46 प्रभागात विविध लोकोपयोगी उपक्रमातून नागरिकांशी नाळ जोडण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा निर्धार करण्यात आला आहे. शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन कार्यक्रमाची आखणी केली आहे.

लोकोपयोगी उपक्रमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागरिकांशी जोडणार नाळ

शहरातील शेवटच्या नागरिकांना वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सदैव तत्पर आहे. लोकांची कामे करणे, अजित दादा पवार यांच्या विचारधारेवर आणि विकासाच्या पावलावर पाऊल ठेवून युवक आघाडी वाटचाल करणार आहे. त्यासाठी विविध लोकोपयोगी उपक्रमांचे अयोजन केले जात आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या संकल्पनेतून आगामी पंधरा दिवस शहरात असे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

प्रभाग क्रमांक ७, ८, ९ मध्ये संयुक्त रित्या भोसरीच्या संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेतील ४८० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे शहर उपाध्यक्ष प्रकाश डोळस, शहर सरचिटणीस नितीन सुर्यवंर्शी,भोसरी विधानसभा उपाध्यक्ष अनिल चव्हाण आयोजन यांनी केले होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अभिराज गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष लवकुश यादव, शहर सरचिटणीस दीपक गुप्ता, शहर सचिव कुणाल कडू, रोहित खोत आणि इतर सहकारी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 13 सोनवणे वस्ती चिखलीतील विकास अनाथ आश्रमात मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख, युवा नेते मनोज जरे, शहर उपाध्यक्ष लवकुश यादव, सरचिटणीस दीपक गुप्ता, सचिव कुणाल कडू, राहुल सिंग, विजय जरे, दत्ता जरे, मनोज होरे, दीपक कांबळे,संजय शिंदे, भोसरी विधानसभा सरचिटणीस रोहित खोत आदी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक ३९ विशालनगर पिंपळे निलख येथे मोफत आधार कार्ड वाटप अभियान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस संकेत जगताप यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये पिंपळेनिलख,

विशाल नगर,जगताप डेअरी येथील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमोल भाऊ रावळकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष लवकुश यादव,शहर सरचिटणीस दीपक गुप्ता, शहर सचिव कुणाल कडू,आणि इतर सहकारी उपस्थित होते.

लोकोपयोगी उपक्रमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागरिकांशी जोडणार नाळ

प्रभाग क्रमांक 17 आणि 18 येथील नागरिकांसाठी सावित्रीबाई फुले ग्रंथालय गांधीनगर पिंपरी येथे कान, नाक, घसा तपासणी व नेत्र तपासणी मोफत आरोग्य शिबिर राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे घेण्यात आले. याचे शहर सचिव अमोल बेंद्रे व सहकारी पदाधिकारी यांनी केले. या शिबिराचे माजी महापौर योगेश भाई बहल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रानभाई शेख, महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट यांच्या हस्ते झाले तर त्या कार्यक्रमास मा नगरसेवक समीरदादा मासुळकर,मा नगरसेविका गीताताई मंचरकर, माजी नगरसेवक नारायण बहिरवडे,माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.