मिरजगावातील १३ रूग्णांसह कर्जत तालुक्यात सापडले २५ कोरोना रूग्ण | बेशिस्त नागरिकांमुळे वाढतेय संख्या

मिरजगावातील १३ रूग्णांसह कर्जत तालुक्यात सापडले २५ कोरोना रूग्ण | बेशिस्त नागरिकांमुळे वाढतेय संख्या

अहमदनगर : कोरोना नियंत्रणासाठी शासनाने घालून दिलेले नियम नागरिकांकडून पाळले जात नाहित. त्यामुळे कर्जत तालुक्यात कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस भर पडत आहे. आज (ता. २३ ऑक्टोबर) एकुण २५ कोरोना (कोविड-19) रूग्ण सापडले.

आजमितीस तालुक्यातील कोरोना रूग्ण संख्या १७०८ झाली असून त्यापैकी १४७० रूग्ण बरे झाले आहेत. तर २१५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.

मिरजगावात वाढतेय संख्या

मिरजगाव हे तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठे असलेले गाव असल्याने दररोज मोठी वर्दळ याठिकाणी असते. मात्र, सोशल डिस्टसिंग, मार्क, हाताची स्वच्छता आदी सुरक्षेच्या बाबींकडे नागरिक, व्यावसायिक, सरकारी तसेच खासगी कार्यालयातील व बँकेतील कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मिरजगावात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.

गावानुसार आज सापडलेले रूग्ण :

1.कुळधरण-02

2.तळवडी- 01

3.ताजु-04

4.चापडगाव-01

5.मिरजगाव-13

6.राशीन-02

7.करपडी-01

8.अळसूनदे-01