Cyclostyle : सायक्लोस्टाईल केलेल्या प्रश्नपत्रिका पूर्वी शाळेत दिल्या जायच्या; काय होते हे तंत्र

Cyclostyle : सायक्लोस्टाईल केलेल्या प्रश्नपत्रिका पूर्वी शाळेत दिल्या जायच्या; काय होते हे तंत्र

विलास स्वादी

१ - स्टेनसिल - हां एक फूलसकेप आकाराचा टिश्यू पेपर सारखा स्क्रीन असे. या वर स्टेनसिल पेन वापरून मजकूर लिहिला जायचा किवां टाइपराइटर / टंक लिखित केला जायचा.

स्क्रीन वर टंक लेखन करण्या साठी - टाइपराइटर मधील रिबन काढून ठेवावी लागे. मग नेहमी प्रमाणे टंकखन करत. या प्रकारात अक्षर सरळ स्क्रीन वरच उमटावाली जात. अक्षराच्या वळणा प्रमाणे स्क्रीन वर ठसा उमटला जाई.

टाइपराइटर कीती जोराने बड़वायाचा याचे भान राखावे लागे. अक्षर चुकीचे उमटवल्यास चूक सुधारण्या साठी लाल रंगाचे सोलुशन ब्रश ने चुकीच्या अक्षरावर हल्केच लावावे लागे. हे सोलुशन ठसा भरून टाके. नंतर त्याच जागेवर योग्य अक्षर हळू वार पणे उमटावे लागे.

एकन्दर टंक लेखन कौशल्याचा कस लागेल असे ते काम होते. ज्याना ते जमे ते ऑफिस मधे रुबाब दाखवत. यात घाई गड़बडीत एखाद दुसरी ओळ दुसऱ्या पानावर घ्यावी लागे. काही वरिष्ठ या वरुन शेरेबाजी करतच.

छपाई / Printing - छपाई साठी वेगळे मशीन असे. हे मशीन आजच्या युगतील ओफ़्सेट प्रिंटिंग चे पूर्वज होते असे म्हणता येईल.

यात एका खाली एक असे उभ्या मांडणी मधे आडवे दोन दंड गोल / सिलिंडर असत. वरच्या सिलिंडर ला शाई / printing ink लावलेली असे. स्क्रीन वरच्या सिलिंडर वरून प्रवास करे त्या वेळी अक्षरांच्या ठश्या तून मागच्या बाजूने काही प्रमाणात शाई भरली जात असे.

स्टेनसिल खालच्या सिलिंडर वर च्या प्रवासात कागदाच्या संपर्कात येई. इथे थोडासा दाब असल्याने स्टेनसिल वरच्या अक्षर ठष्यात मागच्या बाजूनेभरलेली शाई पाझरून कागदावर उमटे.

हातानी चालावणारे अथवा इलेक्ट्रिक वर चालणारी मशीन असत. या मशीन ची AMC / maintenance contract वर जगणारी मंडळी च खरी भाग्यवान होती.

यात कधी कधी कार्यालयीन कार्य पद्धतीत माजकूराच्या शेवटी सक्षम अधिकाऱ्या ची सही आवश्यक असे. या साठी एक स्टेनसिल पेन असे. अनेकांना स्टेनसिल न फाडता सही करणे जमत नसे.