पुणे : कोरोनाच्या काळात सर्वच महाविद्यालये अचानक बंद झाली, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना अचानकच घरी बसाव लागले. लॉकडाऊन कधी संपेल, हे हि सांगता येत नव्हते. पण विद्यार्थी आणि प्राध्यापक एकत्र आले तर काय चमत्कार होऊ शकतो, हे थेरगाव येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या तंत्रनिकेतन ने दाखून दिले आहे.
संगणक विभागातील सर्व प्राध्यापकानी एकत्र येवून सर्व विद्यार्थ्यांना अद्यावत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करून ७०० पेक्षा ज्यास्त अंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रमाणपत्रे पूर्ण करून घेतली आहेत. ही प्रमाणपत्रे जगभरातील नावाजलेलया विद्यापीठातून व आयटी कंपन्यातून पूर्ण केली आहेत, हे विशेष.
यात मिशिगन, कॅलिफोर्निया, कोलोरॅडो टोरोंटो, डुक, अल्बर्टा, जॉन्स हॉपकिन्स, न्यूयॉर्क, लंडन, मेरीलँड, वॉशिंग्टन, वरजिनीय, गेवर्गीय, याले इंपिरियल कॉलेज, रईस, ऍरिझोना विद्यापीठाचा समावेश आहे. तसेच गुगल, आयबीएम व सिस्को सारख्या आयटी कंपन्यांचा सुद्धा यात समावेश आहे.
याबाबत बोलताना संगणक विभाग प्रमुख प्रा. विकास सोळंके यांनी सांगितले कि, सुरूवातीला अंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम विद्यार्थी पूर्ण करतील का, या बद्दल शंका होती. पण विद्यार्थ्यांना विश्वासात घेवून वेळोवेळी त्यांच्या अडचणी दूर केल्या व महाविद्यालयातूनच अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले. हे अभ्यासक्रम म्हणजे ज्ञानाचे भांडार होते. फक्त सिस्को कंपनीचीच १३५ प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी मागील एका महिन्यात मिळवली आहेत, याची दाखल घेत सिस्को कंपनीने महाविद्यालयात अकादमी उघडली असून अल्प दरात सिस्कोची अभ्यासक्रम पुर्ण करता येतील.
शिक्षण हे अभ्यासक्रम पुरते मर्यादित न राहाता ते ग्लोबल झाले असून आमचे महाविद्यालय यात मागे नसल्याचे मत प्राचार्य गीता जोशी यांनी व्यक्त केली. तसेच या महाविद्यालयाला एन.बी.ए, नवी दिल्लीचे मानांकन सुद्धा मिळाले आहे. असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष बी. जी. जाधव व सचिव किशोर मुंगळे यांनी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.