ॵंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब आणि सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगरचे प्रा.डॉ.महेबूब सय्यद सरांनी ऑनलाईन पध्दतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले डॉ.बाबासाहेबांनी कायद्याचे शिक्षण घेऊन, त्याचा वापर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी केला. गुलामीत जीवन जगणाऱ्या माणसांना मुक्तीचा मार्ग डॉ. बाबासाहेबांनी दाखवला. सामाजिक समता येण्यासाठी आर्थिक समता येणे आवश्यक असून स्वातंत्र्य, समता, बधुंता व न्याय याच्यांवर आधारीत समाजनिर्मिती व्हावी यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केला. राज्यघटनेतून सामान्य माणसाला असामान्य बनविण्याचे काम डॉ.बाबासाहेबांनी केले. देशाच्या राज्यकर्त्या राणीच्या पोटी जन्म न घेता. मतपेटीतून राज्यकर्ता निर्माण होईल. असे समानतेवर आधारीत संविधान डॉ. बाबासाहेबांनी निर्माण केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.अरुण आंधळे साहेब म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणातून प्रज्ञा, शिल, करूणा ही तत्वे समाजात रुजावीत म्हणून शिक्षणसंस्था स्थापन केल्या. तसेच बाबासाहेबांनी कामगारांच्या प्रश्नावरही काम केले. बाबासाहेब एक थोर अर्थशास्त्रज्ञही होते. त्यांनी मोफत व दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळावे यावर भर दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हाच विचार घेवून, रयत शिक्षण संस्थाही शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आहे.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी जगाला मानवतेचे मुल्य दिले. त्यांनी बहिष्क्रूत समाजाला जागे करुण त्यांना त्यांच्या हक्काची जाणिव करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर, तर आभार राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.रमेश रणदिवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सायली गोसावी यांनी केले. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य प्रा.कुशल पाखले, प्रा.स्नेहल रेडे, ग्रंथपाल प्रा.एकनाथ झावरे यांनी मदत केली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.सुहास निंबाळकर, आय.क्यू.ए.सी. विभागप्रमुख डॉ.सविता पाटील, फिजिकल डायरेक्टर. प्रा.बी. एस.पाटील, परीक्षा विभागप्रमुख. डाॅ.तानाजी हातेकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवकांबरोबर सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.