- उन्नती सोशल फाऊंडेशन व शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद
पिंपरी : पिंपळे सौदागर येथे आयोजित केलेल्या “पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन” २१ किमी स्पर्धेत शर्मिला संतोष आणि मनोज यादव यांनी प्रथम क्रमांक तर खुल्या गटात गौरी गुमास्ते आणि सुनिल शिवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून रोख पारितोषिक पटकाविले.
रविवारी (ता. ५ डिसेंबर) उन्नती सोशल फाऊंडेशन, किशान स्पोर्ट्स इंडिया प्रा. लि. व नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच यशदा रियाल्टी ग्रुप यांच्या सहकार्याने हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की, “गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने शारीरिक व मानसिक महत्त्व अधोरेखित केले आहे. सुदृढ शरीर व सक्षम मन बनविण्यासाठी धावणे हा एक उत्तम व दर्जेदार व्यायाम आहे. केवळ खेळ म्हणून किंवा स्पर्धा म्हणून मॅरेथॉन नाही तर आपल्यातील सर्वांगीण बदलाची क्षमता धावण्यात आहे. आरोग्य, मानसिकता, स्वभाव, सवयी या सामान्य बाबींचा सकारात्मक सराव यामुळेच होतो.”
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे: २१ कि. मी. स्त्री गट : प्रथम क्रमांक : शर्मिला संतोष, व्दितीय क्रमांक : वेदांशी जोशी, तिसरा क्रमांक : अनुभूती चतुर्वेदी, पुरुष गटात : प्रथम क्रमांक : मनोज यादव, व्दितीय क्रमांक : अनुराग कोणकर, तिसरा क्रमांक: उडेसिंग सागंल्या पडवी,
खुला गटात स्त्री : प्रथम क्रमांक : गौरी सलिल गुमास्ते, व्दितीय क्रमांक : सजीनी रोशन, तिसरा क्रमांक : स्मिता कुलकर्णी,
पुरुष गट : प्रथम क्रमांक : सुनिल शिवणे, व्दितीय क्रमांक : सावळेराव भिमा, तिसरा क्रमांक : सुरेश यादव.
१० किमी स्त्री गट : प्रथम क्रमांक : शिवानी चौरासिया, व्दितीय क्रमांक : बुध्द राम, तिसरा क्रमांक : समिक्षा खरे,
पुरुष गटात : प्रथम क्रमांक : मन्नु सिंग, व्दितीय क्रमांक : पाराजी गायकवाड, तिसरा क्रमांक : अनिल कोरवी,
खुला गटात स्त्री : प्रथम क्रमांक : स्वाती अगरवाल, व्दितीय क्रमांक : प्रतिभा, तिसरा क्रमांक : प्रसन्नप्रिया रेड्डी,
पुरुष गट : प्रथम क्रमांक : दिपक ओचाणी, व्दितीय क्रमांक : अतुल गोडबोले, तिसरा क्रमांक : प्रसाद कुलकर्णी ;
५ किमी स्त्री गट : प्रथम क्रमांक : गायत्री शिंदे, व्दितीय क्रमांक : वेदश्री विनोद, तिसरा क्रमांक : खुशबू बघेल,
पुरुष गटात : प्रथम क्रमांक : दत्तात्रय भोर, व्दितीय क्रमांक : ओमकार अनंत तिसरा क्रमांक : हरिराम चंदर, खुला गटात स्त्री : प्रथम क्रमांक : शिल्पी मंडल, व्दितीय क्रमांक : डॉ. मेघा रॉय, तिसरा क्रमांक : शितल गिरसे,
पुरुष गट : प्रथम क्रमांक : विशाल धोंडीबा, व्दितीय क्रमांक : रमेश चिविलकर, तिसरा क्रमांक : अरुण मोरे यांनी बक्षिस पटकाविले.
सर्व सहभागी स्पर्धकांना टि-शर्ट, सर्टिफिकेट, मेडल, गुडल बॅग देण्यात आले. तसेच स्पर्धेत २१ किमी श्रेणीतील विजेत्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या रनर्सला अनुक्रमे १००००, ७५०० व ५००० तसेच १० किमी श्रेणीतील विजेत्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या रनर्सला अनुक्रमे ७५००, ५००० व ३००० आणि ५ किमी श्रेणीतील विजेत्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या रनर्सला अनुक्रमे ५०००, ३०००, २००० अशी रोख बक्षीसे देण्यात आले.