विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र रोग तपासणी शिबीर संपन्न

विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र रोग तपासणी शिबीर संपन्न

पार्थ पवार आणि विशाल शंकर वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ३ दिवसीय नेत्र रोग तपासणी मोफत चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले.

वाकड परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. म्हातोबा नगर, काळाखडक, वाकडकर वस्ती या तीन ठिकाणी आयोजित शिबिरात जवळपास अकराशे पेक्षा जास्त नागरिकांनी नेत्र तपासणी केली यामधील साडेसातशे नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर पंचेचाळीस रूग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया लवकरच या माध्यमातून होणार आहे. शिबिरामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबिरार्थींची नेत्र तपासणी करण्यात आली.

विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र रोग तपासणी शिबीर संपन्न

नागरिकांनी नेत्र तपासणी बाबत जागरूक होणे आवश्यक आहे तसेच त्यांचे आरोग्य राहणीमाण उंचविण्याच्या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते, याचा लाभ नागरिकांनी घेतला याबाबत समाधान व्यक्त होत आहे. वाकड परिसरातील नागरिकांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे म्हणून अशाप्रकारचे आरोग्य शिबीर सातत्याने आयोजित करण्यात येतील तसेच आगामी काळात नागरिकांच्या हिताचे अनेक उपक्रम राबविण्याचा संकल्प श्री विशाल वाकडकर यांनी केला आहे.