गुन्हे दाखल होऊनही पोलिस व आमदारांच्या आशीर्वादाने चालतेय बोगस पुरंदर विद्यापीठ?

मानवता हितायचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी यांनी उघड केला घोटाळा

गुन्हे दाखल होऊनही पोलिस व आमदारांच्या आशीर्वादाने चालतेय बोगस पुरंदर विद्यापीठ?

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पुणे : राज्याची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सरकारी अधिकाऱ्यांची निष्क्रियता याला कारणीभूत आहे, तसेच राज्यातील मंत्रीच बोगस विद्यापीठाचे विद्यार्थी असतील तर जनतेने न्याय कोणाकडे मागावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असा संताप मानवता हितायचे अध्यक्ष धनराज चौधरी यांनी व्यक्त करत पुणे पोलीस अधीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

याबाबत धनराज चौधरी यांनी सांगितले की, “पुरंदर विद्यापीठातून” हजारो विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पदव्या विकत घेतल्या आणि या पदव्यांचा वापर करून खासगी व सरकारी नोकरी देखील मिळवली. काहींनी या पदवीचा वापर करून पालिकेत प्रमोशन देखील घेतले, मात्र त्यात होरपळ झाली ती सामान्य विद्यार्थ्याची.

आज सामान्य विद्यार्थी कॉलेजच्या फि भरून, आठ-आठ तास शिकवणी करून, रात्रंदिवस मेहनत करून पदव्या प्राप्त करतो आणि त्यानंतर नोकरीसाठीही धडपड करतो. मात्र आजच्या युगातील स्पर्धेमुळे त्याला नोकरी मिळतोच असे नाही. मात्र काही लोकं शॉर्टकट पद्धतीचा वापर करून पदव्या विकत घेवून वशिलेबाजीने नोकरी मिळवतात किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळवतात.

पोलिसांची हात मिळवणी?

पुरंदर विद्यापीठाच्या संचालकावर उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी पहिला गुन्हा दाखल केला. त्यांतर सुयोग क्षत्रिय यांनी दुसरा गुन्हा दाखल केला व त्यांतर डॉ. अभिषेक हरिदास यांनी तिसरा गुन्हा दाखल केला. असे असले तरी सदर व्यक्ती व त्याचे साथीदार आजही पदव्या विकत आहेत. पोलीस तपास तरी काय करतात, हा प्रश्न उपस्थित होतो. पोलीस व आरोपी हे हात मिळवून कामे करतात काय? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण जर पंचनाम्याद्वारे पोलिसांनी आरोपीचे प्रिंटर व इतर गोष्टी सीझ केल्या असतील तर आरोपी परत अश्या पदव्या कुठे छापतो? असा प्रश्न एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पडतो. असे चौधरी म्हणाले.

म्हणजेच पोलीस अधिकारी एकतर तपास आयोग्य पद्धतीने करत आहेत किंवा आरोपीला मिळाले आहेत, असे का वाटू नये? काही आमदार व पोलिसांच्या आशीर्वादाने सदर इसम तिसऱ्या गुन्ह्यानंतर देखील पैसे घेवून पदव्या विकत आहे. मानवता हितायचे अध्यक्ष यांना सदर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः यात लक्ष घालून आरोपीच्या मोबाईलवर संपर्क करून सदर आरोपी आजूनही पदव्या विकत आहेत. याची खात्री करून या बाबत वर्दी देखील दिली. मात्र, पोलिसांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने मानवता हितायचे अध्यक्ष धनराज चौधरी यांनी पुणे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे. असे चौधरी यांनी सांगितले.