पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचे पुन्हा पाच बळी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचे पुन्हा पाच बळी

पिंपरी चिंचवड, ता. १८ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचे पुन्हा एकदा दर्शन झालेले आहे. कारण काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे किवळे येथील अनधिकृत होर्डिंग पडल्यामुळे निष्पाप पांच लोकांचा बळी गेला आहे. या अनधिकृत होर्डिंग विषयी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिके ला निवेदन दिलेले आहेत.

परंतु प्रत्येक वेळी त्या निवेदनांना पालिकेने केळाची टोपली दाखवली आहे असेच दिसते. याच अनधिक होर्डिंग संदर्भात पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुनील कुसाळकर यांनी पालिकेमध्ये निवेदन दिलेले आहे. परंतु त्यांच्या या निवेदनावर कुठलीही कार्यवाही पालिकेच्या वतीने आज पर्यंत झालेली नाही आणि आज त्याचंच फलित म्हणून काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे स्वतःच्या बचावासाठी आडोशाला थांबलेले पाच निर्दोष नागरिक विनाकारण मारले गेले. आता तरी पालिकेचे डोळे उघडावे असेच काहीसे सामान्य जनतेच म्हणणे आहे.