संत नगर मोशी प्राधिकरणातील श्री स्वामी समर्थ मंदिर भक्त रंगात नाहुंन गेले

संत नगर मोशी प्राधिकरणातील श्री स्वामी समर्थ मंदिर भक्त रंगात नाहुंन गेले

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

मोशी, दि. १९ : संत नगर मोशी प्राधिकरणातील श्री स्वामी समर्थ सेवा चरित्रच्या वतीने नुकताच श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक पंकज पवार यांच्या माध्यमातून दिवसभर विविध कार्यक्रम करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ महाराजांचा सकाळी अभिषेक त्यानंतर सांप्रदायिक भजन तसेच सामूहिक नामस्मरण सोहळा तब्बल दोन लाख वेळा सर्व उपस्थित भाविक भक्तांच्या माध्यमातून करण्यात आला. मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त स्वर्गीय जिजाई दाजीराम पवार यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन युवा नेते योगेश लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी शिवाजी पवार, लक्ष्मण पवार, हिराबाई आवटे, अनिता पवार, रेश्मा गवस, संस्थापक पंकज पवार आदी उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. आमदार महेश लांडगे, नगरसेविका नम्रता लोंढे, योगेश लोंढे, निखिल काळकुटे, चंद्रकांत तापकीर, सागर तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष दत्ता गवस, संतोष राठोड, महिला स्वयंसेविका प्रीती पवार, शामल जयेश झोंबाडे, साक्षी जगताप, दिपाली कोंडे, किरण भगत, अजय जगताप, संदीप आवटे, शुभम गवस, अनिल शिंदे, जयश्री अभंग आदी सर्व महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.