मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांना समाजरत्न पुरस्कार जाहिर

मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांना समाजरत्न पुरस्कार जाहिर

पिंपरी : साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे मानव विकास संस्था फुले पिंपळगांव (ता. माजलगांव जि. बीड) यांच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड पत्र मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे मानव विकास संस्थाचे अध्यक्षा उषा गायकवाड व सचिव सुमंत गायकवाड यांनी पत्राद्वारे हे जाहिर केले आहे.

शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा पर्यावरण, साहित्य,सामाजिक इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याची दखल घेत समाजरत्न पुरस्कारासाठी डॉ.धनंजय भिसे यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. डॉ.धनंजय भिसे यांनी मातंग साहित्य परिषदेच्या माध्यामातून वंचित समाजात साहित्यीक व सांस्कृतिक चळवळ वाढवण्याचा संकल्प हाथी घेतला आहे.

कोणत्याही वंचित समाजाचा भैतिक विकास जर घडवायचा असेल तर त्या समाजाला साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीला जवळ करावे लागेल. तरच त्या समाजाचा भौतिक आणि सामाजिक विकास घडू शकेल ही भूमिका डॉ. भिसे यांची पाहायला मिळते. या पुरस्काराचे वितरण फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे लवकरच एका जाहीर कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांना समाजरत्न पुरस्कार जाहिर