मुलींनो श्रद्धा वालकर हत्याकांडातून धडा घ्या

मुलींनो श्रद्धा वालकर हत्याकांडातून धडा घ्या 

ज्योत्स्ना राणे

काय होता तीचा गुन्हा म्हणुन दिलीस का रे, तीला सजा. हेच ना तुझावर प्रेम केले? श्रद्धा वालकर, आफताबची प्रेम कहाणी ऐकुन रुह कापुन येते. श्रद्धाने प्रेम केल्यास तिचे ३५ तुकडे करण्यात आले. आई वडीलांनी हिंदु आणि मुस्लिम धर्माला विरोध केल्याने श्रद्धा आफताब सोबत घराबाहेर पडली. त्यांच्यात भांडण झाली म्हणुन आफताबने श्रद्धाचे ३५ तुकडे करुन फिजमध्ये ठेवले आणि थोडे करुन जंगलमध्ये फेकले.

हे हत्याकांड एकच मुला-मुलींना एकच शिकायला देते, हिंदु असो किंवा मुस्लिम, आई वडीलांच्या विरोधात जाऊ नका. मुलींनो तुम्ही ६ महिन्याच्या प्रेमासाठी आई वडीलांनी जे तुमच्यावर २०, २५ वर्ष प्रेम केले. ते का विरुन जातात आणि आफताब सारख्या हैवानाचे शिकार होतात. आई वडीलांनी खुप स्वप्न बघीतलेली असतात. तुमच्या लग्नाची आणि तुम्ही ज्या मुल आणि त्याचा परिवाराची काही माहीती नसते. अशा मुलांचा हात धरुन पळुन जातात, याला प्रेम नाही म्हणतात, त्याला आई वडीलांनच्या तोंडाला काळीमा फासने म्हटले जाते. मुलींनो क्षणभराच्या प्रेमासाठी आई-वडीलांचे प्रेम-माया विसरु नका. बाप आयुष्यभर झटतो, त्या एका प्रसंगासाठी ते म्हणजे कन्यादान.

मुलींनो हिंदु संस्क्रुतीला जपा आणि मुलींनो नका वापरु शरीरावर छोटे कपडे, नाही तर आफताब सारखे राक्षस करेल तुमच्या शरीराचे तुकडे.

“सावधान मुलींनो स्वत:चे निर्णय स्वत: च घेणार असा हट्ट करु नका. जन्म देणारे आई वडील, पालनपोषण करणारे आई वडिल, आपले हितचिंतक असतात. आपल्या हितासाठी रात्रंदिवस चिंतीत असतात. कायद्यानुसार योग्य वय झाल्याने स्वतंत्रतेचा अधिकार असल्याने त्याचा गैरवापर आपण आपल्या जिवनात करु नये. फेसबुक व ऑनलाईन भेट झालेल्या व्यक्ती वरती विश्वास ठेऊ नका. कुटूंबावरती विश्वास ठेवा, त्यांच्या ऐवढा चांगला विचार, तुमचा कोणी करु शकत नाही. कुंटुबाला दुखावुन तुम्ही आयुष्यात कोणाची निवड करता, हे सर्वस्वी तुमच्या हातात असते. ती व्यक्ती कशी आहे, हे अगोदर पडताळुन पहा, मगच पुढील निर्णय घ्या.

Actions

Selected media actions