स्वच्छ, मुबलक, पुर्ण वेळ पाणी द्या अन्यथा पुढील महिन्यात बेमुदत उपोषण करणार : सायली नढे

स्वच्छ, मुबलक, पुर्ण वेळ पाणी द्या अन्यथा पुढील महिन्यात बेमुदत उपोषण करणार : सायली नढे
  • पाणी समस्येबाबत महिला कॉंग्रेसचा निर्वाणीचा इशारा

पिंपरी चिंचवड शहराला २४x७ पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन प्रशासन आणि पदाधिका-यांनी आतापर्यंत अनेक बैठकांमध्ये दिले होते. तरी देखिल पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने मनपा भवनावर जन आंदोलन करीत हंडा मोर्चा काढला होता. त्यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी पुढील पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करु असे महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले होते. आता शहरभर पाणी समस्येने उग्ररुप धारण केले आहे. यावर प्रशासक या नात्याने आयुक्त राजेश पाटील यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा. अन्यथा पुढील महिन्यात पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी दिला.


पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. २४ मार्च) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका निर्मला सद्‌गुरु कदम, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, प्रियांका कदम, दिपाली भालेकर, डॉ. मनिषा गरुड, छायाताई देसले, निर्मला खैरे, शिल्पा गायकवाड, सुप्रिया पोहरे, आशा भोसले, प्रियांका मलशेट्टी, आशा काळे, अनिता अधिकारी, लता फर्नांडिस, सीमा हलकट्टी, वैशाली शिंदे, सोनु दमवाणी, अनिता ओव्हाळ, स्वाती शिंदे, पुष्पा गाडे, चतुरा धेंडे, व्दारका गाडे, रुद्रावणी आव्हाड, सुजाता धेंडे, रजीया शेख, द्रौपदी लोखंडे, राणी चंदनशिवे, वंदना चंदनशिवे, दिव्या चंदनशिवे, तेजश्री चंदनशिवे, रेणूका मुखटे, संगीता यादव, रजिया मुजावर, सोनाली गायकवाड, नंदनी विश्वकर्मा, सुमन विश्वकर्मा, चंदन ओव्हाळ, सुमन साळवे, जयश्री सगर, सुमन नाईक, शिला मायकल, मारीया मायकल, अनिता शहाणे, अमृता पारवे, जनाबाई मोरे, रंजना सदामती, आशा पारवे, शकुंतला हटकर, जनाबाई मोरे, सुमन नाईक, सुनिता वाघमारे, संगिता देडेकर, लक्ष्मणी खरकदारे, प्रतिक्षा खरकदारे, रुकसाना शेख, ऋतृजा उबाळे, तृप्ती जाधव, प्रियांका रॉय, अनिता साहनी, मंगल सरोट, शुशीला एकुरके, माया वाघ, अर्चना नहाणे, शोभा क्षिरसठ, शबनम शेख, आरती शुल्का, खुर्शिदा शेख, सादिया शेख आदींसह शहरातील विविध भागातून कॉंग्रेसच्या महिला भगिनी उपस्थित होत्या.


माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सायली नढे यांनी सांगितले की, शहराला मुख्यता पवना धरणातून तसेच काही भागात आंद्रा, भामा आसखेड धरणातून आणि एमआयडीसीतून पाणी पुरवठा केला जातो. मागील दोन वर्ष पवना धरण शंभर टक्के भरले होते. अद्यापही धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. तरी देखील प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहरातील नागरिकांना पाणी समस्या भेडसावत आहे. आयुक्त राजेश पाटील आणि त्यांच्या प्रशासनाने अद्यापही पाणी पुरवठ्याबाबत गांभिर्य दाखविलेले नाही. याचा निषेध म्हणून गुरुवारी (दि. २४ मार्च) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे आंदोलन करण्यात येत आहे.


माजी नगरसेविका निर्मला कदम यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराला रोज ६०० एमएलडी पाणी लागते. यापैकी ३० एमएलडी पाणी एमआयडीसीकडून दिले जाते. उर्वरीत पाणी पवना धरणातून घेतले जाते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांसाठी २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहीनी प्रकल्प, भामा आसखेड पाणीपुरवठा योजना आणि आंद्रा धरणातूनही पाणी घेऊन शहरातील नागरीकांना देणार होते. मागील पाच वर्षात पवना बंद जलवाहिनी प्रकल्प जैसे थे आहे. भामा – आसखेड – आंद्रा पाणी पुरवठा योजनेसाठी हजारो कोटींचा खर्च करुन अद्यापही प्रकल्प पुर्ण झालेले नाहीत याचाही महिला कॉंग्रेस निषेध करीत आहे.


ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर म्हणाल्या की, एमआयडीसीकडून आकुर्डी, निगडी, भोसरी, आनंदनगर झोपडपट्टी आणि मनपा भवन समोरील रत्ना हॉटेल परिसरासाठी पाणी पुरवठा होतो. जुन्या कनेक्शनसाठी १८ ते १९ रुपये प्रती हजार लिटर दर असा एमआयडीसी दर आकारते. हा दर मनपाच्या पाणी पट्टी दरापेक्षा दुपट्टीहून जास्त आहे हा नागरिकांवर अन्याय आहे.


छायाताई देसले म्हणाल्या की, शहरातील पाण्याची गरज पाहता केंद्र सरकारच्या अनुदानातून अमृत योजना प्रकल्पही राबविण्यात येत आहे. यामध्येही २४ तास मुबलक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मागील पाच वर्षात या योजनेसाठी शहरातील बहुतांशी रस्ते खोदाई करुन जलवाहिनी टाकण्यासाठी हजारो कोटी रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत. अशा विविध योजनांव्दारे नागरिकांच्या पैशाचा चुराडा मागील पाच वर्षात भाजपाच्या पदाधिका-यांनी केला आहे. आगामी आठ दिवसात शहरातील झोपडपट्टी, गावठाण व चाळींमधिल परिसरातील पाणी पुरवठा प्रशासनाने सुरु करावा अन्यथा महिला कॉंग्रेस बेमुदत उपोषण करतील असेही देसले म्हणाल्या. यावेळी महिलांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.