औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथील मराठी विभागाने ‘मराठी भाषा व गोवा संस्कृती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागातील सन्माननीय प्रा.चिन्मय घैसास सर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.चिन्मय घैसास सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वाचन लेखन आणि श्रवण कौशल्य अधिकाधिक विकसित केली पाहिजेत. त्यामधून आपला व्यक्तिमत्व विकास होतो. त्यामुळे आपले बोलण्याचे सामर्थ्य वाढते. व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण आपल्या मधील कौशल्य विकसित केले पाहिजेत. जर विद्यार्थ्यांनी आपल्यामधील कौशल्य विकसित केले तर त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. गोवा हे पर्यटनाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी गोवा राज्यामध्ये वेगवेगळ्या देशांमधून अनेक पर्यटक येतात. अशावेळी पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी बहुभाषिक व्यक्तींची गरज असते. महाराष्ट्रामधूनही अनेक पर्यटक गोव्यामध्ये येतात. अशा वेळी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मराठी भाषिक गाईड हवा असतो. जर आपले भाषेवर चांगले प्रभुत्व असेल, तर आपल्याला या ठिकाणी जॉब करण्याची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यामधील वाचन, लेखन आणि श्रवण कौशल्य अधिकाधिक विकसित करावीत. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी मराठी विभागातील तेजस राजिवडे या विद्यार्थ्याने कवी संतोष पवार यांची ‘बाई रोजच्या घागरी’ ही कविता सादर केली. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेब आणि उपप्राचार्य प्रा.डॉ.संजय नगरकर सर यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ.अतुल चौरे यांनी तर कार्यक्रमाचे आभार तेजस राजवाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मराठी विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.