Hadapsar : सी.ए.टी.सी. 707 कॅम्प एन.सी.सी स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय

Hadapsar : सी.ए.टी.सी. 707 कॅम्प एन.सी.सी स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय 

हडपसर, २८ जून २०२५ (प्रतिनिधी) : 2 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. पुणे अंतर्गत सी.ए.टी.सी. 707 कॅम्चे आयोजन 2 महाराष्ट्र बटालियनचे ए.ओ. लेफ्टनंट कर्नल प्रविण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. एन.सी.सी. ग्रुप हेडकॉटर सेनापती बापट रोड येथे २७ मे ते ०५ जून २०२५ रोजी या स्पर्धा झाल्या. या कॉम्प मध्ये 2 महाराष्ट्र बटालियन अंतर्गत विविध महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिचे 405 कॅडेट्स सहभागी झाले होते. 

या कॅम्पमध्ये एस. एम. जोशी  महाविद्यालयातील 20 कॅडेट्स सहभागी झाले होते. यावेळी विविध स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये एकूण महाविद्यालयामध्ये एस. एम. जोशी महाविद्यालय द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच कॅडेट्सने गट ड्रिल स्पर्धा – प्रथम क्रमांक, गट अग्निशमन स्पर्धा – प्रथम क्रमांक, गट अडथळे प्रशिक्षण – प्रथम क्रमांक, सांस्कृतिक – कार्तिक शिंदे – प्रथम क्रमांक, वाद्ये ताशा – प्रथम क्रमांक, फायरिंग वैयक्तिक (मल्लिकार्जुन यमाजी) – प्रथम क्रमांक, व्हॉलीबॉल – द्वितीय क्रमांक मिळविला. 

या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल प्रविण कुमार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील एन.सी.सी कॅडेट्सला लेफ्टनंट प्रा. राधाकिसन मुठे यांनी मार्गदर्शन केले. एन.सी.सीच्या कॅडेट्सचे महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.