पिंपरी : काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा सुमारे २५० नागरिकांनी लाभ घेतला तर कोरोना प्रतिबंधक लसीकरणास मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी निगार बारसकर, प्रकाश मलशेट्टी, विरेंद्र गायकवाड, सौरभ शिंदे, काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे, दशरथ वीर, रवि नांगरे, किरण नढे, पोपटशेठ नढे, विशाल नढे, सनी नढे, निर्मला खैरे, स्वाती शिंदे, सोनू दमवानी, रचना गायकवाड, प्रियंका कदम, सुरेश नढे, नवनाथ नढे, मच्छिंद्र तापकीर, दिलीप काळे, हरेश नखाते, सुजाता नखाते, आशा नांगरे, लोंढे काका, निवृत्त आरोग्य मुकादम मोरे, प्रताप सुर्वे, सुनंदा काळे, मुन्ना गुप्ता, विपुल मलशेट्टी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सायली नढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
१५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॉक्सीनचा पहिला व दुसरा डोस, कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाले असेल तर त्या ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस, हेमोग्लोबिन तपासणी, शुगर तपासणी, मोफत युनिर्व्हसल पास (लसीकरण प्रमाणपत्र) व मोफत वाचनालय असे विविध समाजोपयोगी उपक्रम वाढदिवसानिमित्त राबविण्यात आले.
दरम्यान, यावेळी जुनी सांगवी येथील सुभाष भंडारे (उपाध्यक्ष – स्वभिमानी रिपब्लिकन पार्टी, पिंपरी चिंचवड शहर), शरद कांबळे, प्रविण पाठक यांनी शहराध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सायली नढे म्हणाल्या की, कोरोना महामारीमुळे आपल्याला आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे. याची जाणीव झाली. त्याच अनुषंगाने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच कोरोना पासून संरक्षण मिळावे यासाठी लहान मुलांना पहिल्या व दुसऱ्या डोसचे तर ज्येष्ठांना बुस्टर डोसचे लसीकरण आयोजित करण्यात आले.