
पिंपरी चिंचवड : आई, वडील, शिक्षक यांच्याकडून आणि महाविद्यालयीन काळात आरएसएसच्या माध्यमातून मला संस्काराचे धडे मिळाले. संस्कार म्हणजे विवेक, चांगल्या वाईटातील अंतर समजणे म्हणजेच संस्कार होय. छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा माझ्यावर पगडा आहे. त्यांच्या विचारांमुळेच मला प्रेरणा मिळाली. प्रत्येक काम करताना मी सकारात्मक विचारानेच केले. त्यामुळेच मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री’ आहे. त्यामुळे मी पुन्हा येईन अशी मिश्किल टिपणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्तव्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी शनिवारी (दि. 10) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित मोरया युथ फेस्टिव्हल 2020 चे आणि स्मृतीचिन्हाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर माई ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, माजी मंत्री बाळा भेगडे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर तुषार हिंगे, सिने अभिनेते राहुल सोलापूरकर आदी उपस्थित होते.
प्रस्ताविक, स्वागत ॲड. सचिन पटवर्धन आणि आभार सदाशिव खाडे यांनी मानले.
- PUNE : लॉजमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, पत्रात लिहिलं कारण; पोलिस दलात खळबळ
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उमेदवारांची यादी
- Mamurdi : मामुर्डीत सोसायटी पार्किंगमध्ये गांजा जप्त
- अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- Ahilyanagar : अश्विनी नांगरे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरव
