आकुर्डी : प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरात कोरोनाच्या केसेस वाढत असताना रक्तदान करण्याचे प्रमाण घटले आहे.
त्यामुळे रक्ताच्या उपलब्धतेवर त्याचा परिणाम काम होत आहे म्हणून आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे आपचे शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले. या शिबिरामध्ये तब्बल. ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांसोबतच युवकांचा सहभाग ही उल्लेखनीय होता.