पिंपरी : शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व कोकणाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. काळेवाडीतील विजयनगरमध्ये गुरूवारी झालेल्या या समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
त्यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, कामगार नेते अनिलभाऊ मोरे, शहराध्यक्ष सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, शहर संघटीका उर्मिला काळभोर, युवा अधिकारी विश्वजीत बारणे, विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष दस्तगीर मणियार, विधानसभा प्रमुख अनिता तुतारे, सह संघटिका शारदा वाघमोडे, उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे, उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते, माजी शहर संघटीका सुशीला पवार व सुनिता चव्हाण, विभागप्रमुख प्रशांत तरवटे व गोरख पाटील, विभाग समन्वयक राजेंद्र पालांडे, युवा सेना अधिकारी संजय संधु, उपविभाग प्रमुख सागर शिंदे, सुहास शहाळे, अनिल पालांडे, शाखा प्रमुख गणेश झिळे, महाड पोलादपूर शिवसेना संपर्क प्रमुख (पुणे विभाग) सचिन साळुंखे, महाड तालुका युवासेना अधिकारी (पुणे विभाग) रविंद्र चव्हाण, कामगार नेते सुशील मिरगल, ज्येष्ठ शिवसैनिक अरूण आंब्रे, सुभाषदादा पवार, आदीक भोसले, कृष्णा निकम, विलास गवळी, विलास निकम, बाळू ननावरे, उमेश गुंड, महाड पोलादपूर समाज सेवा संघ अध्यक्ष अविनाश उत्तेकर, शरद राणे, संजय मोरे, श्रीकांत पारकी, अनिल हातणकर, माजी सैनिक राजेश जाधव, भास्कर पाटील, संतोष चिकणे, गणेश मालुसरे, दिपक तरडे, भरत सकपाळ, संदीप पवार, दिनकर जाधव, सरपंच चंद्रकांत धनावडे, नंदू जाधव, प्रदिप सकपाळ, निलेश मोरे, बाबू नरे, शशिकांत जाधव, सुरेश निकम, संदीप जाधव, रामदास चिकणे, विलास महाडिक, शिवाजी जाधव, राकेश शेठ मोरे, राजेंद्र जाधव, नितीन उत्तेकर, इरफान शेख, भास्कर जाधव, धनाजी धनावडे, दीपक चव्हाण, बाबासाहेब जगताप, दिलीप शेलार, उषा नाईक, प्रमोद (गुड्डू) यादव, मंगेश जाधव, शंकर खेडेकर, दत्ता जाधव, शाम पवार, गणेश धोबी, भाग्यश्री म्हस्के, भरत राणे, सुभा नाईक, राम पवार, रमेश साळुंखे, पदमाकर कवे, सुनिल साळुंखे, संजय गायखे, सतिश खोपके, फ्रान्सिस अंकल, मदन शेठ, बाळासाहेब भिलारे यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे हे भाजपच्या कारभारावर जोरदार प्रहार करत म्हणाले की, भाजपचे निवडून आलेल्या उमेदवारांनी महापालिकेतील पैसा लुटला असून ते आता त्याच पैशाने मतदार विकत घेणार आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार विकू नका. असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.
आमदार भरत गोगावले म्हणाले की, वेळप्रसंगी धावून येणारा खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक असतो. त्यामुळे खऱ्या शिवसैनिकाला साथ द्या. जनतेचा प्रतिसाद पाहता आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचे दिसत आहे.