कोरोनामुळे मरण पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे २० लाखांची मदत

कोरोनामुळे मरण पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे २० लाखांची मदत

पुणे : इंदापूर तालुक्यातील कोरोनामुळे मरण पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने २० लाख रुपयांचा मदत धनादेश देण्यात आला. त्यामुळेसंस्थेच्या मदतीमुळे दोन्ही कुटुंबाना आधार मिळाला आहे. संतोष खुटाळे व सोपान कांबळे या दोन प्राथमिक शिक्षकांचा कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबियांना आधार देण्यासाठी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने आपल्या शिक्षक सभासदांसाठी शिक्षक कल्याण निधीतून संतोष खुटाळे यांच्या पत्नी सविता व सोपान कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश दिला.

शिक्षक पतसंस्थेचे सभापती सुनिल वाघ, उपसभापती वसंत फलफले यांचे हस्ते त्यांना ही मदत करण्यात आली. यावेळी माजी सभापती किरण म्हेत्रे, संभाजी काळे, सुनिल शिंदे, विलास शिंदे, दत्तात्रय ठोंबरे, संचालक आदिनाथ धायगुडे, बालाजी कलवले, तज्ज्ञ संचालक सुनिल चव्हाण, सचिव संजय लोहार, माजी तज्ज्ञ संचालक भारत ननवरे, शिक्षक समितीचे नेते मोहन भगत,प्रविण धाईंजे,प्रताप शिरसट,शिक्षक नेते सयाजी येवले,सदाशिव रणदिवे उपस्थित होते.

यावेळी सभापती सुनील वाघ म्हणाले, इंदापूर शिक्षक सहकारी पतसंस्थास दैव शिक्षक सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. संस्थेने सभासदांचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला आहे. शिक्षक सभासदाचे कोणत्याहीकारणाने निधन झाल्यास त्या शिक्षकांच्या कायदेशीर वारसास शिक्षक कल्याणनिधीतुन १०लाखांची मदत तात्काळ व तत्परतेने दिली जाते.या मदतीमुळे शिक्षक कुटूंबास आर्थिक आधार मिळत असल्याने सभासदांमधून समाधान व्यक्त केले जाते. शिक्षक कल्याण निधीतुन शिक्षक सभासदांना विविध आजारासाठी तात्काळ ५० हजारांची देखील मदत दिली जाते. सन १९२५ साली स्थापना झालेल्या या संस्थेने राज्यातील आदर्श पतसंस्था असा नावलौकिक मिळवला आहे.

स्वर्गीय सोपान कांबळे यांचे भाचे सयाजीराव येवले यांनी पतसंस्थेने दिलेल्या मदतीबद्दल खुटाळे व कांबळे कुटुंबाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करत पतसंस्था आधारवड असल्याचे म्हटले.

Actions

Selected media actions