संरक्षण सामुग्री उत्पादक देश म्हणून भारताचा उदय : लष्करप्रमुख बिपीन रावत

पुणे : जागतिक दर्जाची संरक्षण सामुग्री वाजवी दरामध्ये भारताकडून बनविली जात आहे. जगाच्या क्षितिजावर संरक्षण सामुग्रीचे उत्पादन करणारा देश म्हणून भारत पुढे येतोय असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले.

संरक्षण सामुग्री उत्पादक देश म्हणून भारताचा उदय : लष्करप्रमुख बिपीन रावत


औंध मिलिटरी सेंटर येथे आयोजित भारत व १७ आफ्रिकन देशातील सैनिकांच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप बुधवारी झाला. यावेळी बिपीन रावत बोलत होते. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट सतींदर कुमार सैनी यावेळी उपस्थित होते. संयुक्त लष्करी सरावामध्ये १८० देशांनी सहभाग घेतला. या सरावामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाºया विविध देशांतील सैन्य अधिकाºयांचा बिपीन रावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
बिपीन रावत म्हणाले, भारत आणि आफ्रिकन देशांची देशाची विकासाची भागीदारी आहे. ही केवळ सुरूवात आहे, भविष्यातही ते सुरू राहील. आफ्रिकन देशांना आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्यासाठी भारताने लक्ष केंद्रीत केले आहे.