पिंपरी : शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळांचे आयएसओ मानांकित करण्यात याव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आज रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत जवळपास १४० ते १४५ प्राथमिक शाळा सुरु आहेत. यामधे मराठी शाळा १२८ तर इंग्रजी शाळा ९ व उर्दू ७ शाळा आहेत. या शाळेमधे शक्यतो गरीब, सर्वसामान्यांचे विशेष करून झोपडपट्टीत राहणारे मुले-मुली झ देशाच मोठ्या प्रमाणात शिकत आहेत. या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत आहे का? तसेच स्वच्छता, आरोग्य व पिण्याचे स्वच्छ पाणी, खेळाचे मैदान, अशा अनेक गोष्टी आहेत का? नेमके किती मुले-मुली या शाळेत शिकत आहेत, व ते शिक्षण घेताना दिसतात का? त्यांची बौद्धिक व शारीरिक प्रगती झाली आहे का? किती मुले परिस्थितीमुळे शिक्षण सोडून घरी किंवा मिळेल ते काम करतात, या सर्व गोष्टींची नोंद घेऊन त्यांना खाजगी शाळेप्रमाणे उत्तम शिक्षण व सुविधा मिळणे गरजेचे आहे.
या अनुषंगाने भविष्यामधे महानगरपालिकेच्या शाळेमधे शिक्षणाची आवड निर्माण होणयासाठी, तसेच उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांचे आय.एस.ओ. मानांकन मानांकन करण्यात यावे.