खलापुर : स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही वाहतुक आघाडी कोकण प्रदेशच्या वतीने कोविड काळात चांगली कामगिरी केल्याबद्दल खलापुर पोलिसांचा प्रमाणपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच खलापुर पोलिस्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या वाओसी पोलिस चौकी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक-अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश अध्यक्ष सुनिल झोंबाडे, प्रदेश उपाध्यक्ष अलताप मनसुरी, शिवशाही वाहतुक आघाडी कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव, खलापुर तालुका अध्यक्ष अनिल म्हामुनकर, रायगड जिल्हाध्यक्ष शंकर धोतरे, अमित जाधव, आप्पा देशमुख उपस्थित होते.