सावित्रीमाईंचा वसा घेऊन महिला सशक्तीकरणाचा कुंदाताई भिसे यांचा निर्धार

सावित्रीमाईंचा वसा घेऊन महिला सशक्तीकरणाचा कुंदाताई भिसे यांचा निर्धार

पिंपरी, ता. ३ जानेवारी : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कोरोना नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अपर्णा जावळे, चेतना तळेले, संध्या काळे, प्रभाकर तळेले, रमेश वाणी, प्रा. अनिल शहा, ह.भ.प. विकास काटे, डॉ. सुभाष पवार आणि विठाई वाचनालयाचे वाचक उपस्थित होते.

सावित्रीमाईंचा वसा घेऊन महिला सशक्तीकरणाचा कुंदाताई भिसे यांचा निर्धार

आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतीकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. सावित्रीमाईंचे प्रगतशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हिच खरी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी केले.

क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा स्त्री सशक्तीकरणाचा वसा उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने अखंडपणे चालविण्याचा निर्धार यावेळी भिसे दांपत्यांनी केला.

Actions

Selected media actions