Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा निधी खात्यात पडण्यास सुरुवात

Ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana (Marathi News) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेचे आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता पडण्यास उशीर झाला. मात्र, मंगळवारपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे.

याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “ महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

ही योजना का विशेष आहे?

1) आर्थिक आधार: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार.

2) सन्मानाचा भाव: केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे.

3) सशक्तीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं. हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा आहे. “ अशा मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या आहेत.