हिंमत असेल तर गेल्या तीस वर्षातील कामांची चौकशी करा | नगरसेवक संदीप वाघेरे यांचे खुले आव्हान

हिंमत असेल तर गेल्या तीस वर्षातील कामांची चौकशी करा | नगरसेवक संदीप वाघेरे यांचे खुले आव्हान

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपला बदनाम करण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहरातील नेत्यांकडून केले जात आहे. एसीबीकडून चौकशी सुरू आहे, मात्र राष्ट्रवादीचे स्थानिक नेते राजकारण करीत आहेत. आमचे त्यांना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर गेल्या तीस वर्षातील सर्व कामांची चौकशी करावी? असे खुले आव्हान भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेत केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी टीका केली आहे. या टीकेचा समाचार भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी घेतला आहे.

नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले,“ महापालिकेतील लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून पक्षीय राजकारण करणे चुकीचे आहे ”.एसीबीने केलेली कारवाई आणि त्याबाबत सुरू असलेल्या तपासातून सत्य बाहेर येईल,मात्र खालच्या पातळीवर राजकारण करणे चुकीचे आहे. महापालिकेच्या साडेचार वर्षातील कामांची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी केली आहे. माझे त्यांना आव्हान आहे. त्यांनी महापालिकेची स्थापना झाल्यापासून स्थायी समिती आणि त्यांनी केलेल्या कामांची चौकशी करावी. मग कळेल कोणाच्या काळात किती चुकीची कामे झाली आहेत, कोणी भ्रष्टाचार केला आहे.

“कतृत्वाने न्हवे तर महापालिकेच्या जिवावर मोठे झालेल्यांनी भाजपला तत्वज्ञान शिकवू नये”, अशी टीकाही वाघेरे यांनी केली.