एस. एम. जोशी महाविद्यालयात राष्ट्रीय मानवाधिकार दिन संपन्न

एस. एम. जोशी महाविद्यालयात राष्ट्रीय मानवाधिकार दिन संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या, एस. एम. जोशी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय मानवाधिकार दिन” साजरा करण्यात आला. यावेळी इतिहास विभागातील प्रा. दीपक गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांना व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मानवाधिकार या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना त्यांनी मानवाधिकाराचे घोषणापत्र वाचून दाखवले. तसेच मानवाधिकाराशी संबंधित अनेक घोषणा व नियमावलीचे व जाहीरनाम्याचे सविस्तर विवेचन केले. सन 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदीच्या तरतुदीमध्ये समाविष्ट केल्याचे विस्तृत विवेचन त्यांनी केले. दरवर्षी जगभर 10 डिसेंबर हा दिवस ‘मानवाधिकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयालयातील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी राष्ट्रीय मानवाधिकार, मानवाधिकार आणि कर्तव्ये, मानवाधिकार संकल्पना या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख इतिहास विभागप्रमुख डॉ.दिनकर मुरकुटे यांनी तर कार्यक्रमाचे आभार मराठी विभागातील प्रा.डॉ.संदीप वाकडे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील इतिहास विभागातील विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.