राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे : तटकरे

Sunil Tatkare

नवी दिल्ली (लोकमराठी) : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली असून, सकारात्मक निर्णय होत आहेत. राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा दोनच जागा कमी असून, अडीच वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी इच्छा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत औपचारिक सहमती झाली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या (शुक्रवार) शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे. आजही दिल्लीत बैठकांचे सत्र सुरुच असून, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत.

तटकरे म्हणाले, “की राज्याची मुख्यमंत्री महिला व्हावी, अशी काही चर्चा झालेली नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची चर्चा अजून झालेली नाही. शिवसेनेपेक्षा दोन जागा कमी असल्याने राष्ट्रवादीलाही मुख्यमंत्रीपद मिळावे असे मला वाटते.”

Actions

Selected media actions