काळेवाडी : ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ५२० विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. एकुण आठ ठिकाणी या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, बक्षीस वितरण सोहळा पुढील आठवड्यात होणार असल्याचे प्रवीण अहिर यांनी सांगितले.
सध्याच्या परिस्थितीत कोरोनामुळे पसरलेला हाहाकारामुळे मानवी जीवनाची झालेली अवस्था व अश्यातच स्वत:ची सुरक्षा, वैयक्तिक स्वच्छता, लस शोधण्यात भारतीय संशोधकांनी मारलेली यशस्वी मजल, लसीकरणाचा चालू असलेला प्रवास आणि याचेच एक फलित म्हणजे शाळा सुरू करण्याबाबतचा झालेला निर्णय. या निर्णयाला अनुसरूनच विद्यार्थ्यांना कुठेतरी एक शाळेची व आपल्या सवंगड्याची व वर्गमित्रंची गाठभेट व्हावी व ती एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून व्हावी यासाठी काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्याचे ठरवले. त्यासाठी विद्यार्थ्यांची नावनोंदणी घेण्यास सुरुवात केली.
कोरोना परिस्थितीमुळे व त्याच्या नियमावलीला अनुसरून १०० विद्यार्थ्यांची नोंदणी गृहीत धरून तयारीला सुरुवात केली परंतु विद्यार्थी व पालकांचा उत्साह बघता ५२० विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली. अश्या परिस्थितीत एवढ्या विद्यार्थ्यांची व्यवस्था कण्यासाठी आठ वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करून स्वयंसेवकांची टीम करून कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली.
पूर्वप्राथमिक, पहिली – दुसरी, तिसरी – चौथी व पाचवी ते सातवी अश्या वयोगटामध्ये विभागणी करून त्यानुसार स्पर्धेचे विषय विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. स्पर्धेचे आयोजन हॅपी थॉटस् बिल्डिंग, बालाजी लॉन्स, गणेश कॉलनी, क्रांतिवीर कॉलनी, वर्धमान भूमी सोसायटी, विठ्ठल मंदिर, पाटील हॉस्पिटल, स्टार बर्ड शाळा, व काही सभासदांनी आपल्या स्वताच्या सोसायटी मध्ये अश्याप्रकरे नियोजन करून हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला.
दरवर्षी मुले प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत जाऊन विविध कार्यक्रमात भाग घेतात पण यावर्षी शाळा बंद असल्यामुळे हिरमुसली मुले पुन्हा शाळा सुरू होण्याअगोदर परत शाळेतील वातावरण बघून पालकही खूप खुश झाले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा पुढील आठवड्यात करण्याचे ठरवले आहे..
यावेळी काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन सदस्य प्रदीप हाटे, सुरेश पाटील, प्रवीण अहिर, दिलीप भोई, वैभव घुगे, आशाताई इंगळे, सोमनाथ पवार, खेमचंद तीलवानी, शुभाष कांबळे, शारदा वाघमोडे, सूनंदाताई काळे, निलेश सुर्यवंशी, अमित देशमुख, किशोर अहिर व इतर सामजिक करकर्ते यांनी उपस्थित राहून योग्य नियोजन करून हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला.