रॉयल रहाडकी ग्रीन सोसायटीतर्फे आयोजित दुचाकी रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

रॉयल रहाडकी ग्रीन सोसायटीतर्फे आयोजित दुचाकी रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

रहाटणी : जागतिक महिला दिनानिमित्त रॉयल रहाडकी ग्रीन सोसायटीच्या वतीने शिवराज नगर ते कोकणे चौक दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी नववारी साडी, डोक्यावर फेटा अशी महाराष्ट्राची पारंपारिक वेषभूषा करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

तसेच सोसायटी परिसरात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी आपले कला-गुण सादर केले. यावेळी ज्येष्ठ महिलांसाठी आयोजित केलेल्या विशेष खेळांना मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांनी फॅशन शो व रॅम वॉक करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. सहभागी झालेल्या सर्वांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात व दुचाकी रॅलीत डॉ. काजल पांडे, वंदना आहुजा, प्रियंका दलाल, श्रीजिता कुंडू, आसावरी पदमावार, प्रिती शहा, प्रिती पटोदिया, स्नेहा भालकर, कल्याणी पाटील, प्रिया पाटील, विशाखा आसारे, शितल बोबडे, नयन क्षिरसागर, दिनाल तोडेवाल, निकिता भामरे, सुजाता ऐखंडे, नलिनी तांबे, सुजाता, नेत्रा पाटील, सायली तोडकर, विद्या चौधरी, मंजूश्री, ज्योती चौहान, वैशाली पाटील, सुजाता वाल्हेकर, पुजा मौर्या, सरिता, प्रतिक्षा पवार, वैशाली, कल्पना चित्रवार, नेहा यंबल, मोनिका चौधरी, सुमन पाटीदार, रश्मी मोरे इत्यादींनी सहभाग घेतला होता.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रॉयल रहाडकी ग्रीन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे संयोजन सोसायटीच्या सांस्कृतिक विभागाने केले होते.