पिंपरी चिंचवड : सध्या महाराष्ट्रात कोरोना बधितांचा आकडा वाढतच चालला आहे. कोविड १९ या विषाणूची तीव्रता पुणे विभाग आणि मुंबई विभागात वाढलेली आहे. बधितांचा वाढत्या आलेखामुळे प्रशासनास मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातच ‘ फ्रंट वॅlरीयर्स ‘ म्हणून कार्यरत असणाऱ्या राज्यातील ५०० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलिसांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. अश्या परस्थितीत शासनाच्या निर्देशानुसार शहर पोलिसांनी आता मनुष्यबळ पूर्ततेसाठी पोलीस मित्रांची तसेच एस पी ओंची मदत घेतलेली आहे. कोविड १९ योध्दा म्हणून ते शहर पोलिसांना सहकार्य करणार आहेत. ३० जून २०२० च्या मुदतीपर्यंत ते पिंपरी आयुक्तालय अख्यारीत शहर पोलिस विभागास वरिष्ठ अधिकारी यांचे सूचनेनुसार सहकार्य करणार आहेत.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना घाळी, विजय मुनोत, अॅड विद्या शिंदे, बाबासाहेब घाळी, जयेंद्र मकवाना, विशाल शेवाळे,सतीश देशमुख,लक्ष्मण इंगवले,मंगेश घाग,संदीप सकपाळ,संतोष चव्हाण,अमित डांगे,मनोज ढाके,शशिकांत इंगळे,राजेंद्र येळवंडे,सुरेश गावडे,सुनिल वाघ,महेश काकडे,प्रकाश पानस्कर,जयप्रकाश शिंदे,प्रविण इथापे,प्रदीप इथापे,निहार जाधव,नितीन मांडवे,सुरेश येरूनकर,अजय घाडी,सतीश मांडवे,तुषार मकवाना,अमित चौहान,अमोल कानु हे पोलीस मित्र – एस पी ओ शहर हद्दीत पोलीस प्रशासनास सहकार्य करीत आहेत.
कोविड -१९ योद्धांना चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक सत्यजित खुळे, तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे,देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी मार्गदर्शन केले व सूचना दिल्या.
या संदर्भात चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने म्हणाले, “सध्या आपल्या शहरामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दीडशे पेक्षा जास्त नागरिक बाधित झाले आहेत.त्याचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पोलिसांना सहकार्य करण्याकरिता पोलीस मित्रांची मोलाची मदत होत आहे. ह्या पुढेही विविध भागामध्ये त्यांची मदत घेतली जाईल.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” आपत्कालीन काळामध्ये समितीचे स्वयंसेवक, एसपीओ तथा पोलीस मित्र गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस प्रशासनास बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, गर्दी नियंत्रण, पालखी सोहळा व गणेशोत्सव बंदोबस्त, रात्रगस्त अश्या उपक्रमामध्ये मदत करत असतत्. समितीचे “प्रथम मदतनीस” अपघात ग्रस्तानांही वैद्यकीय मदत देत असतात.सदरचे सर्व एसपीओ – पोलीस मित्र हे ३० जुन २०२० पर्यंत पोलीस प्रशासनास त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सहकार्य करतील.