वडगाव मावळ, दि.२८ (लोकमराठी) – ‘परीक्षा पे चर्चा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रम वडगाव मधील न्यू इंग्लिश स्कूल &ज्युनियर कॉलेज व रमेशकुमार सहानी इंग्लिश मिडीयम स्कूल या दोन्ही शाळांमध्ये हा कार्यक्रम विध्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने दाखवण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विध्यार्थ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक विध्यार्थी व शिक्षक यांना सुद्धा या कार्यक्रमाचा अभ्यास पूर्वक अनुभव पाहायला मिळाला.
परीक्षेदरम्यान निर्माण समस्यांना कशा प्रकारे सामोरे जावे, अभ्यासाची सुरुवात कशाप्रकारे केली पाहिजे, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे नियोजन कशाप्रकारे केले पाहिजे या संदर्भातील एकंदरीत विविध उदाहरणांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सदुपयोग विद्यार्थ्यांना नक्कीच होईल.
याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष अनंता कुडे, मा. सभापती गुलाबराव म्हाळसकर, कार्यध्यक्ष प्रसाद पिंगळे, माजी सरपंच नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, युवक अध्यक्ष विनायक भेगडे,नगरसेवक किरण म्हाळसकर रवींद्र म्हाळसकर, भूषण मुथा, मकरंद बवरे, हरीश दानवे, आदीसह शाळेचे अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर, शिक्षक लक्ष्मणराव आगळमे, शिक्षिका शोभा सूर्यवंशी तसेच अनेक शिक्षक वर्ग व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.