काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा; सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा; सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरी : काळेवाडीतील विजयनगर परिसरात दिवसाआड व अपुऱ्या पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले असून काही भागात दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची पिण्याची पाण्याची गरज व आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत इरफान शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कायमस्वरूपी निवासी असून आम्ही नियमारित्या शासकीय, निमशासकीय कर भरत आहोत. तसेच मतदानाचा हक्क देखील बाजवितो. आपणास माहिती देऊ इच्छितो की, आम्ही आपणास मार्च महिन्यात दररोज पाणीपुरवठा करण्यासंबंधी विनंती अर्ज केले होते. तसेच नागरिकांना पाण्याची गरज वादळी आहे. मात्र, अद्याप कोणतेच ठोस निर्णय ना झाल्याने विजयनगर भागात राहणारे सदनिकाधारक पाणी प्रश्नी त्रासले आहेत.

या भागात होणारा पाणीपुरवठा रहिवासी व सोसायटीमध्ये राहणारे सदनिकाधारकांना पुरेसा नाही. तसेच नदीपात्रातील प्रदूषित पाणी जमिनीत झिरपते व बोअरवेल मधून येते. त्यामुळे बोअरवेलमधील पाणी दुर्गंधीयुक्त व वापरण्यास योग्य नाही. त्यामुळे नियमितरित्या दररोज पाणीपुरवठा करण्याचे आदेश लवकरात लवकर द्यावे व नागरिकांची गैरसोय दूर करावी.

दरम्यान, आम्ही दुसरा पर्याय देखील निवेदनाच्या माध्यमातून कळविला होता. सोसायटीमध्ये, वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यास मार्गदर्शन शिबिरद्वारे नागरिकांना माहिती देऊ करावी. असे झाल्यास काही प्रमाणात पाणी प्रश्न मार्गी लागेल.

विजयनगरमध्ये साई इंवलावे, से रेसिडेन्सी, सुख्वनी, वर्धमान, के. डी.एम., गुलमोहर, साई एमेराल्ड, आदी रेजन्सी, आदी अम्मा, ॲक्रोपोलोईस, साई प्रीतम, अमृत धाम इत्यादी सोसायटीमध्ये राहणारे सदनिकाधारकांना दररोज पाणीपुरवठा करून या त्रासातून मुक्त करावे, व काळेवाडी प्रभाग २२ मध्ये उज्वल, सुफलाम करावे. असे निवेदनात नमूद केले आहे.