मुळशी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश ससार यांची फेरनिवड, तर कार्याध्यक्षपदी प्रदीप पाटील बिनविरोध

Lok Marathi News Network

पुणे : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या पत्रकार संघ मुळशीच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे हिंजवडीतील बातमीदार रमेश ससार तर कार्याध्यक्षपदी ‘लोकमत’चे प्रदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

संघाच्या पौड येथील पत्रकार भवनात झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. संघाचे मावळते अध्यक्ष राजेंद्र मारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेला संघाचे माजी अध्यक्ष धोंडिबा कुंभार, संघाचे मार्गदर्शक  दत्तात्रय सुर्वे, नीलेश शेंडे, बबन मिंडे, दत्तात्रय उभे, दत्तात्रय जोरकर, केदार कदम, रामदास दातार यांच्यासह नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

यावेळी निवडलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष – रमेश  ससार (सकाळ), कार्याध्यक्ष – प्रदीप पाटील (लोकमत), उपाध्यक्ष – सागर शितोळे (पुढारी) व साहेबराव भेगडे (लोकमत), सचिव – मकरंद ढमाले (सकाळ), सहसचिव – कालिदास नगरे (लोकमत), खजिनदार – महादेव पवार (सकाळ).  


त्याप्रसंगी दैनिक पुढारीचे पत्रकार दीपक सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडियाचे जिल्हा पदाधिकारी सतीश सुतार, मुळशी तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सागर धुमाळ, शिवसेनेचे संघटक आबा करंजावणे, वातुंडे गावचे पोलिस पाटील रामदास मानकर आदी उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.