शरदनगरमध्ये पार पडले बालांचे संचलन

शरदनगरमध्ये पार पडले बालांचे संचलन

चिंचवड : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिखली येथील शरद नगर येथे लहान मुलांचे संचलन पार पडले. संध्याकाळी हनुमान मंदिरापासून सुरुवात झाली व संचलन समृद्धी पार्क मध्ये समाप्त झाले. या संचलनमध्ये परिसरातील लहान मुलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला होता.

हा कार्यक्रम बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती. तसेच आपआपल्या दारी रांगोळी काढल्या होत्या व संचालनाचे स्वागत केले. सुरुवातीला वंदे मातरम गीताने सुरुवात झाली. नंतर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. शेवटी बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.