पुणे : कोरोनामुळे हतबल झालेल्या बॅन्ड, बँज्यो शहनाई वादक, हलगी वादक नाशिक ढोलवाले ईत्यादी वाजंत्री कलावंतांना लॉकडाऊनमुळे अत्यंत वाईट दिवस आले असुन बॅन्ड मालक कर्जबाजारी व कलावंत बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे या वंचित घटकांस त्वरित शासकिय मदतीचा हात देऊन सहकार्य करण्यासाठी येथील लोहगाव येथे महाराष्ट्र बॅन्ड कलाकार ऊत्कर्ष संघटनेची तातडीने राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी २०२०-२१ या वर्षासाठी नविन पदाधिकाऱ्यांची निवड सर्व सदस्यांच्या सहमतीने करण्यात आली.
अध्यक्षपदी सागर गायकवाड (पिंपरी चिंचवड पुणे) तर उपाध्यक्ष भगवान खुडे (बीड), सरचिटणीस विजयराजे खंडागळे (अहमदनगर), खजिनदार भाऊसाहेब जगधने (पुणे), कार्याध्यक्ष प्रदिप झेड पाटील (धुळे), राज्य संघटक नरसिंग सुर्यवंशी (ऊदगीर लातुर) आदींची निवड करण्यात आली.