चिंचवड : इंजिनियरिंग क्लस्टर, उज्ज्वला मेमोरियल फाऊंडेशन आणि निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आपले स्वराज्य हरित करण्यासाठी मोठ्या प्राणावर वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोपांची गरज असते. ही गरज ओळखून तीनही संस्थानी मिळून मोफत रोप देण्यासाठी नर्सरी उभी करण्याचा संकल्प केला आहे.
या उपक्रमात मोरया इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक तसेच तीनही संस्थांचे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी २००० पिशव्या माती आणि खताने भरण्यात आल्या. पुढील काळात सह्याद्रीच्या परिसरातील दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींच्या बिया जमा करून त्यांची रोप तयार केली जाणार आहे. चिंचवड येथील इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये १० हजार रोपांची नर्सरी उभी राहत आहे, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवला गेला.