‘मी युथ आयकॉन : माझी उत्कृष्ट कामगिरी’ या स्पर्धेमध्ये श्रुती अक्कलकोटेला उत्तेजनार्थ पारितोषिक

'मी युथ आयकॉन : माझी उत्कृष्ट कामगिरी' या स्पर्धेमध्ये श्रुती अक्कलकोटेला उत्तेजनार्थ पारितोषिक

हडपसर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फले पुणे विद्यापीठ, पुणे आणि ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट बारामती शारदाबाई पवार महिला महाविद्यालय यांच्या वतीने दि. 16 ते 19 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संपन्न झालेल्या स्वयंसिद्धा युवती संमेलनामध्ये महाराष्ट्रातील विविध 93 महाविद्यालयातून 1,875 विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या. या निवासी शिबिरामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमधील दहा विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता.

त्यामध्ये मी युथ आयकॉन: माझी उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेजमधील कु. श्रुती बसवराव अक्कलकोटे ह्या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ पारितोषिक आणि ट्रॉफी मिळाली. या स्पर्धेसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिल्पा शितोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अतुल चौरे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. किशोर काकडे, सांस्कृतिक कमिटीचे सदस्य डॉ. नम्रता मेस्त्री-कदम, प्रा. हेमांगी नानकर यांचे सहकार्य लाभले. कु. श्रुती बसवराव अक्कलकोटे हिचे व या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.