रिसोड प्रतिनिध शंकर सदार: रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथे विष्णू जाधव व मित्र परिवार यांच्यावतीन (दि.२२) मंगळवार रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 60 गावकऱ्याची या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली.
सध्या गावात थंडी, ताप, सर्दी, खोकला, मलेरीया यांसारख्या साथीच्या आजारांनी धुमाकुळ घातला आहे. साथीच्या आजारामुळे दमा बिपी शुगर या सारख्या आजाराचा वयस्कर लोकांना त्रास होत आहे. हा त्रास टाळण्यासाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. शिबीरामध्ये तीन डॉक्टरांच्या पथकाने गावकऱ्यांची तपासणी केली. तपासणीमध्ये काही लोकांना बिपी, शुगर आजार यांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. तसेच नागरिक दुर्लक्ष करत असल्याने त्यांना यावेळी विष्णू जाधव यांनी महत्व पटवून सांगितले.
डॉ. विलास केशवराव वाळले, B.A.M.S. जनरल फिजिशियन सर्जन व बाल रोग तज्ञ, डॉ. निकलेश बोरकर, B.D.S. दंतरोग तज्ञ, डाॅ रोहन निर्बाण हेल्थ केअर लॅब रिसोड या टीमचे सुद्धा विष्णू जाधव, सचिन नरवाडे गजानन पाचरणे गोपाल जाधव यांनी आभार मानले.