एस. टी. सवलत स्मार्ट कार्डचे ज्येष्ठांना मोफत वाटप | उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा सेवाभावी उपक्रम

एस. टी. सवलत स्मार्ट कार्डचे ज्येष्ठांना मोफत वाटप | उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा सेवाभावी उपक्रम

पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाऊंडेशन, ऑल सिनियर सिटिझन असोसिएशन व श्री विठाई मोफत वाचनालय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने एस. टी. सवलत पासचे (स्मार्ट कार्ड) ज्येष्ठ नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. हा सेवाभावी उपक्रम राबविल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे आभार मानले.

पिंपळे सौदागर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘ड’ प्रभाग अध्यक्ष व नगरसेवक सागर आंघोळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

त्याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, हभप विकास काटे, रमेश वाणी, अतुल पाटील, राजेंद्रनाथ जयस्वाल, तुकाराम डफळ, सुधीर दिवाण, रमेश चांडगे आदी उपस्थित होते. तर आलमगीर नाईकवाडी व विकास करवंदे यांनी सदर कार्ड बनविण्यासाठी तांत्रिक सहाय्य केले.

एसटी महामंडळाकडून ज्येष्ठांच्या एसटी प्रवास सवलत योजनेत सुसूत्रता आणण्यासाठी ज्येष्ठ नागरिक नोंदणी करून सदर कार्ड दिले जाते. राज्यात ४० हजार किलोमीटर अंतर प्रवास या कार्डवरून ५० टक्के सवलतीत करता येणार आहे.

यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की, “शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेताना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. त्यामध्ये मोठी धावपळ व ताण सहन करावा लागतो. त्यात ज्येष्ठांच्या योजनाही अपवाद नाहीत. याच अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना आपल्या जवळच व मोफत एसटी सवलत कार्ड मिळण्याची सुविधा केली.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुलसीदास घोलप यांनी केले. तर उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी आभार प्रदर्शन केले.