
हडपसर (प्रतिनिधी - डॉ. अतुल चौरे) : प्रत्येकाने वेळेवर लस घेतली पाहिजे. लस घेतल्यानंतरही काळजी घ्या. यापुढे आपणास covid-19 बरोबर आयुष्य जगावे लागणार आहे. जगातील काही देशांमध्ये तिसरी लाट आली आहे. आपणही दिवाळीचा आनंद घेताना पथ्ये पाळायला पाहिजेत. गर्दी न करता दिवाळी सणाचा आनंद घ्यायला पाहिजे. फटाके विरहीत दिवाळी साजरी करावी. प्रदूषणमुक्त दिवाळीचा उत्सव साजरा करून आनंदी जीवन जगावे. असे विचार रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख व आमदार चेतनदादा तुपे साहेब यांनी मांडले. ते एस .एम. जोशी कॉलेजमध्ये बोलत होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एन. सी. सी.विभाग, हेल्थ केअर सेंटर व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने "मिशन युवा स्वास्थ्य covid-19 मोफत लसीकरण अभियानाच्या" उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केला. त्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी डॉ. दिनेश भेंडे होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मास्कचा वापर करा. वारंवार हात धुवा, आपणच आपली काळजी घ्या. असे ते म्हणाले.

याप्रसंगी फटाके विरहीत दिवाळीच्या पत्रकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे, डॉ. शंतनु जगदाळे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. रंजना जाधव क्रीडा विभागप्रमुख दत्ता वासावे, एन. सी .सी .ऑफिसर प्रा.रमेश गावडे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ. दिनकर मुरकुटे तसेच सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते. लसीकरणासाठी महाविद्यालयातील सर्व विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रंजना जाधव यांनी केले. तर आभार डॉ. अशोक पांढरबळे यांनी मानले.
- PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत
- PIMPRI:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू नये म्हणून पतीने रचला बनाव…
- MUMBAI:प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ…
- Jagtik Mahila Din 2025 : जागतिक महिला दिन का साजरा केला जातो
- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना खरच २१०० मिळणार का; जाणून घ्या...