आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विकास निधीतून महावितरणच्या कामासाठी काळेवाडीत २५ लक्ष | नगरसेविका नीता पाडाळे यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विकास निधीतून महावितरणच्या कामासाठी काळेवाडीत २५ लक्ष | नगरसेविका नीता पाडाळे यांच्या पाठपुराव्याला यश

काळेवाडी : महावितरणच्या विविध विद्युत विषयक कामे करण्यासाठी नगरसेविका नीता पाडाळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून काळेवाडी भागासाठी २५ लक्ष खर्च मंजूर झाला आहे. या कामाचे नढेनगर येथे भूमिपूजन करण्यात आले.

त्यावेळी नगरसेविका नीता पाडाळे, नगरसेवक संतोष कोकणे, नगरसेवक विनोद नढे, महावितरणच्या अभियंता शितल मेश्राम, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हाणकर, कैलास सानप, रमेश काळे, सज्जी वर्की, प्रविण आहेर, दिलीप काळे, बाबासाहेब जगताप, स्विकृत सदस्य विनोद तापकीर, धर्मा पवार, सेन गुप्ता, सीमा ठाकुर, विलास पाडाळे, मारूती आटोळे यांच्या महावितरणचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विकास निधीतून महावितरणच्या कामासाठी काळेवाडीत २५ लक्ष | नगरसेविका नीता पाडाळे यांच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान, मागील आठ महिन्यापासून नगरसेविका पाडाळे यांचा याबाबत पाठपुरावा सुरू होता. आमदारांबरोबर बैठकीही झाली होती. आमदार निधीतील होणाऱ्या या कामामुळे काळेवाडी परिसरातील विद्युत समस्येचा प्रश्न मार्गी लागणार आहे. असे नगरसेविका नीता पाडाळे यांनी सांगितले.

या भागात होणार कामे

साई श्रध्दा कॉलनी, मोरया पार्क, पाटील हॉस्पिटल, पिं.चिं. मनपा बँक, कृष्णा हॉस्पिटल, भक्ती क्लासिक आझाद चौक, गजराज कॉलनी, परमवीर कॉलनी, फिनोलेक्स कॉलनी, कृष्णा रेसिडेन्सी, कृष्णा गार्डन, काळुबाई कॉलनी, अयप्पा मंदिर रोड, राधाकृष्ण कॉलनी, साईसिमरन पार्क ( सेवा विकास बैंक जवळ), श्रीकृष्ण कॉलनी क्रं 1 व 2 येथे सार्वजनिक विद्युत व्यवस्थेची कामे होणार आहेत.