बलुतेदार, आलुतेदार, भटके विमुक्तांचा उद्या राज्यस्तरीय मेळावा

बलुतेदार, आलुतेदार, भटके विमुक्तांचा उद्या राज्यस्तरीय मेळावा

लोक मराठी : बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार, भटके विमुक्त, ओबीसी, एसबीसी यांचा राज्यस्तरीय मेळावा उद्या (शुक्रवार, दि. २०) सकाळी १० ते ३ वाजता कोथरूड-कर्वे चौक (पुणे) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र बाराबलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव यांनी दिली असून या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असेही आवाहन जाधव यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, तर कार्यक्रमाचे उद्घाटक ओबीसी नेते तथा बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तसेच शेकापाचे नेते जयंत पाटील, शब्बीर अन्सरी, बाळासाहेब मिसाळ, आमदार बच्चू कडू, कपिल पाटील, संदेश चव्हाण, प्रतापराव गुरव, सतिष कसबे, दशरथ राऊत, दत्तात्रय चेचर, चंद्रकांत गवळी, मारूती कदम, साहेबरावजी कुमावत, सदाशिव हिवलेकर, शामराव कुंभार, सिध्दार्थ बनसोडे, किसनराव जोरर्वेकर, अनिल शिंदे, प्रा.मुके सर, विशाल जाधव, डॉ. पी. बी. कुंभार, शशिकांत आमणे, दिनानाथ वाघमारे, प्रा. पोपळघट, पी. टी. चव्हाण, सुनिल काळे, अविनाश चव्हाण, ए. के. भोई, चंद्रकांत शिंदे, तुकाराम माने यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात नविन राजकीय समीकरणे घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.