Tag: Adv Jayshri Patil

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधातील राष्ट्रध्वज अवमानाची तक्रार निराधार | कायदा काय सांगतो?
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधातील राष्ट्रध्वज अवमानाची तक्रार निराधार | कायदा काय सांगतो?

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या विरोधात अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे अ‍ॅड. पाटील यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे. मात्र, अ‍ॅड पाटील यांचा हा आरोप निराधार असल्याचे लोकमराठी न्यूजच्या पडताळणीत पुढे आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.&nbsp...