सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा – लॉयन डॉ. सुरेंद्र भोसले
ठाणे : सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर अतिशय जबाबदारीने करायला हवा. त्याचे जेवढे फायदे आहेत तर तेवढाच त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो, याचे भान ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जबाबदारीने या सोशल मीडियाचे तंत्र अवगत करून घेणे गरजेचे आहे. तसेच त्या माध्यमातून पुरोगामी विचार प्रभावीपणे समाजामध्ये घेऊन जायचे आहे. असे प्रतिपादन लॉयन डॉ. सुरेंद्र भोसले यांनी राज्य सोशल मीडिया तर्फे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शाखेतील पदाधिकारी आणि नवीन कार्यकर्ते यांनी चांगला प्रतिसाद दिला. राज्य सोशल मीडिया चे सदस्य श्री प्रसाद खुळे हे या कार्यक्रमाचे संयोजक होते तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांनी पुढाकार घेऊन कुमुद बंगल्यातील ...