बजाज अलियान्झतर्फे आपल्या प्रतिनिधींना सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक व्यावसायिक यंत्रणेची उभारणी
महामारीदरम्यानच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मूल्यवर्धित उत्पादन श्रेणीप्रतिनिधींना ग्राहकांच्या संपर्कात राहाण्यासाठी मदत करणारी कार्यक्षम डिजिटल साधनेनव्या व्यावसायिक वातावरणासाठी प्रतिनिधींना प्रशिक्षित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम
मुंबई : कोव्हिड- 19 ने सर्वच उद्योगांच्या व्यावसायिक वातावरणात लक्षणीय बदल घडवले असून त्यात जीवन विमा उद्योगाचाही समावेश आहे. नव्या वातावरणात लॉकडाउनच्या नियमांमुळे वैयक्तिक भेटींचे प्रमाण अतिशय कमी किंवा नगण्य झाले असून या महामारीचा विमा प्रतिनिधींच्या कामावरही मोठा परिणाम झाल्याचे लक्षात येईल. प्रतिनिधींना स्थिर उत्पन्न मिळावे आणि महामारीच्या काळातही त्यांना ग्राहकांच्या संपर्कात राहाता यावे यासाठी बजाज अलियान्झ लाइफ (Bajaj Allianz Life) या भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एका कंपनीने काही पावले उचलली होती. त्यामधे ग्राहकां...