पिंपरी-चिंचवडमध्ये शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप
पिंपरी : आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला शत-प्रतिशत समर्थन मिळवून देण्यासाठी पक्षाचे शहरातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शंकर जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रमविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, आमदार उमा खापरे व राज्यातील पक्षाच्या इतर नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याबरोबरच शहरात पक्ष आणि...