Tag: cm maharashtra

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा; आप युवा आघाडीची मागणी
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा; आप युवा आघाडीची मागणी

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सर्व अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने केली आहे. आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने रातोरात आपला निर्णय बदलून मोफत एस टी बस सेवा ही केवळ महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजुरांसाठी असेल असा निर्णय दिला. एका बाजूला शासनाने कोटा शहरातून विद्यार्थ्यांना आराम बसमधून मोफत आणले, दुसरीकडे पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी रोजगाराची संधी शोधत, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दुप्पट तिकीट आकारण्याचा निर्णय म्हणजे गेले दीड महिने अडकून पडले, विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. हे सर्व विद्यार्थी परीक्षांच्या अनिश्चित वेळापत्रकाअभावी या शहरांमध्ये थांबून होते. यातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबामधून असल्यामुळे अश...
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत
महाराष्ट्र, मोठी बातमी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मुंबई, ता. 16 (लोकमराठी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. https://youtu.be/OBATQJ5cZC0 याला सकारात्मक प्रतिसाद देऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून 10 कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्याचे निश्चित केले आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच उर्वरित विद्यापीठांकडून देखिल आपत्कालीन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी मदत म्हणून जाहीर केली जाईल असा विश्वासही श्री. सामंत यांनी व्यक्त केला....
मुंबईतील नामवंत डॉक्टर्स ‘कोरोना’ लढाईत शासनाबरोबर; टास्क फोर्स, हॉटलाईनद्वारे मार्गदर्शन करणार; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुंबईतील नामवंत डॉक्टर्स ‘कोरोना’ लढाईत शासनाबरोबर; टास्क फोर्स, हॉटलाईनद्वारे मार्गदर्शन करणार; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई, ता. 13 : कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून मुख्य सचिवांच्या पातळीवर या डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे डॉक्टर राज्यभरातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉकटर्सना हॉट लाईनच्या माध्यमातूनही उपलब्ध असतील. आज या डॉक्टर्सशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला व टास्क फोर्सने करावयाच्याया कामांबाबत सूचना ऐकून त्याप्रमाणे कार्यवाहीचे प्रशासनाला निर्देश दिले. या टास्क फोर्समध्ये खालील डॉक्टर्स असतील महाराष्ट्रात आजपर्यंत 2 हजार पॉझिटिव्ह रुग्ण असून 150 मृत्यू आहेत. मृत्यू दर 6 ते 7 टक्के असून 80 टक्के अशा रुग्णांना किडनी, उच्च रक्तदाब, किंवा इतर दुर्धर आजार होते. राज्यातला वाढता मृत्य...