Tag: Cm Uddhav Thackeray

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… 
महाराष्ट्र, मोठी बातमी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिलं होतं, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या पत्रावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. हे पत्र मीच काढलं होतं अशी कबुली देतानाच दिल्लीतून वारंवार विचारणा झाल्यामुळेच मी रिफायनरीचा प्राथमिक अहवाल मागवला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उद्धव ठाकरे संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. या प्रसंगी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. मी बारसूचं पत्र दिलं होतं. मी पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलिसांच्या बळावर मी तो प्रकल्प का राबवला नाही? उद्धव ठाकरेंचं एवढं ऐकता तर मग गद्दारी करून सरकार का पाडलं? आरेचा निर्णय का फिरवला? कांजूरचा निर्णय का फिरवला? रोज उठून किती लोक बुलेट ट्रेनने अहमद...
सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र

सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वांसाठी पाणी’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, ता. 7 : मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या धोरणाच्या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसाला हक्काचे पाणी मिळणार आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण राबवणारी मुंबई महानगरपालिका देशात पहिली महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, नागरी निवारा परिषद गोरेगांव येथे बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील सर्व निवासी रहिवाशांसाठी असणाऱ्या “सर्वांसाठी पाणी” धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम श...
साकीनाका घटना निंदनीय! फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

साकीनाका घटना निंदनीय! फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई, दि ११ : साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले. ...
माझ्यावर गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे – केंद्रीय मंत्री नारायण राणे
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

माझ्यावर गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई : माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्यसरकारने सुडाचं राजकारण करू नये. असे वक्तव्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. भाजपचे मंत्री नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर राणे यांनी याबाबत त्यांच्या फेसबुक पेजवरून आपले म्हणणे मांडले आहे. दरम्यान, मंत्री राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणला रवाना झाले असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. ...